२. आता त्या पानावरील
' CREATE YOUR BLOG NOW ' वर क्लिक करा.
३. आपल्याकडे जर गुगले ' जी-मेल ' अकांऊंट नसेल तर इथे आपण नविन अकांऊंट बनवू शकता. आणि जर आपल्याकडे
गुगलचे ' जी - मेल ' अकांऊट (Gmail)
असेल तर त्याच पानावर दिलेल्या 'sign in first' या लिंक वर क्लिक करा. व आपल्या जी-मेल अकांऊट आणि पासवर्ड ने लॉगिन
करा.
४. ' जी-मेल' अकांऊंटने
लॉगिन केल्यानंतर आपल्यासमोर ' Sign up for Blogger ' चे पान इथे समोर आपणास आपले नाव व ई-मेल पत्ता
दिसेल. इथे 'Display Name' समोरील चौकोनात आपणास ज्या
नावाने ब्लॉग सुरु करायचा असेल ते नाव द्या. मग खालिल ' I accept the Terms of Service ' पुढील चौकोनावर
क्लिक करा. आता त्या खालिल 'CONTINUE' ह्या लिंक वर क्लिक
करा.
५. आता आपल्या समोर 'Name your Biog' चे पान
उघडेल, त्यात 'Blog title' च्या
पुढील जागेमध्ये आपल्या नविन ब्लॉगचे शिर्षक लिहा. नंतर त्याच्या खालिल
जागेमध्ये 'Blog address (URL)' पूढे आपल्या ब्लॉगचे नाव
लिहा.
http:// (या जागेमध्ये नाव लिहा) .blogspot.com
आपण दिलेले ब्लॉगचे
नाव उपलब्ध आहे का ते पाहण्यासाठी त्याच ठिकाणी दिलेल्या 'Check Availability' वर क्लिक करा.
टिप : नाव उपलब्ध आहे ते पाहताना तिथे 'This blog
address is availble' असा मॅसेज आला म्हणजे आपणास ज्या नावाने
ब्लॉग हवा आहे ते नाव उपलब्ध आहे ब्लॉगचे नाव देताना त्यामध्ये स्पेस (मोकळी
जागा) देवू नये.
एकदा का आपणास नाव
मिळाले कि 'CONTINUE' ह्या बटणावर क्लिक करा.
६. आता आपल्या समोर ' Choose a template ' हे पान उघडले. इथे आपण आपणास हव्या असलेल्या
डिझाईनचा प्रकार निवडा व परत खाली दिलेल्या 'CONTINUE' ह्या
बटणावर क्लिक करा (आपण हि डिझाईन नंतर देखिल बदलू शकता.)
७. आता आपल्या समोर ' Your blog has been
created ! ' हे पान दिसेल
म्हणजेच आता आपल्या ब्लॉग तयार झाला आहे आता आपल्याला हव्या असलेल्या कविता,
कथा, माहिती, गोष्टी,
घटना, इत्यादी आपल्या ब्लॉगवर टाकण्यासाठी
सुरुवात करण्यासाठी खालिल 'START POSTING' ह्या बटणावर
क्लिक करा.
८. आता आपल्या पुढे खालिल चित्रामध्ये दाखविलेल ' Posting ' चे पान उघडेल.
त्या चौकोनामध्ये
आपणास मायक्रोसॉफ्ट वर्ड प्रमाणे बटणे दिसतील त्याचा वापर करुन त्या चौकोनामध्ये
आपणास हवे असलेले साहित्य टाईप करा व खाली ह्या बट्णावर क्लिक करा तसेच त्यावरील जागेत 'Titie' समोर शिर्षक द्या.
९. बस्स. इतके केल्याने आपले साहित्य आपल्या ब्लॉगवर येईल व आता
आपल्या समोर ' Your blog post published successfully! ' हे
पान उघडले या पानावर मोठ्या अक्षरामध्ये असलेल्या ' View Blog ' ह्या बट्णाच्या बाजूला असलेल्या '(in a new window)' ह्या लिंक वर क्लिक करा मग आपणास आपण टाईप केलेले साहित्य आपल्या
ब्लॉगवर पानावर पाहता येईल.
आपण पून्हा त्याच
पानावरील 'Edit Post' बट्णावर क्लिक करुन आपल्या
साहित्यामध्ये फ़ेरबद्ल करुन पुन्हा साठवू शकता अथवा 'Create a new Post' वर क्लिक करुन नविन साहित्य आपल्या ब्लॉगवर टाकू शकता.
१०. पुढच्या वेळेस आपल्या ब्लॉगवर जर काही आपणास काही नविन माहिती
द्यायची असल्यास पून्हाे www.blogger.com वेबसाईट आपल्या जी-मेल अकांऊटने लॉगिन केल्यास आपल्यासमोर आपल्या
ब्लॉगची माहिती समोर दिसेल, ज्यामध्ये
नविन माहिती देण्यासाठी, ब्लॉगची डिझाईन, आपली माहिती, जूनी माहिती डिलीट करण्यासाठी तसेच
इतर गोष्टी करण्यासाठी लिंक्स दिसतील.
|
No comments:
Post a Comment